आयपीएलच्या सोळाव्या हंगामाच्या ऑक्शनची तारीख समोर आल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार ऑलराऊंडर रवींद्र जाडेजा सीएसकेसोबत राहणार की अन्य दुसऱ्या संघाशी जुडणार?
अशा चर्चांना सुरुवात झालीय. रवींद्र जाडेजा त्यांच्याच संघाकडून खेळणार, असा दावा चेन्नई सुपरकिंग्डकडून वारंवार केला जातो
परंतु, रवींद्र जाडेजानं सीएसकेच्या संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय, अशा बातम्यांनाही वेग आलाय
आयपीएल 2023च्या ऑक्शनपूर्वी चेन्नईचा संघ जाडेजाला रोखण्यासाठी पूर्ण जोर लावेल, असंही म्हटलं जातंय.
इनसाइड स्पोर्ट्सच्या अहवालानुसार, येत्या पाच ते सहा दिवसांत रवींद्र जडेजाच्या सीएसकेमध्ये कायम राहण्याबाबत स्थिती स्पष्ट होऊ शकते
सीएसके संघ व्यवस्थापन एका आठवड्यात रवींद्र जडेजाशी संपर्क साधेल.
जडेजाशी संपर्क होऊ शकला नाही, तर त्याला मिनी ऑक्शनपूर्वी रिलीज केलं जाईल,
असं सीएसकेच्या अहवालात दावा करण्यात आलाय.
सीएसकेच्या एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र जाडेजा आणि चेन्नईच्या संघात दुरावा निर्माण झालाय, याची सर्वांनाच कल्पना आहे.
रवींद्र जाडेजा गेल्या काही महिन्यांपासून सीएसके मॅनेजमेन्टचा फोन कॉल्स किंवा मॅसेजचा रिप्लाय देत नाही.
जाडेजाचं अजूनही सीएसकेसोबत लीगल कॉन्ट्रॉक्ट आहे. यामुळं संघ व्यवस्थापन त्याच्याशी अखेरचा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जाईल.