नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदनानं तिच्या हातावर Irreplaceable असं लिहिलेला टॅटू काढला आहे. रश्मिकाच्या या टॅटूचा अर्थ 'कधीही बदलू शकणार नाही'असा होता. अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या हातावर डॅडिज लिटील गर्ल असं लिहिलं आहे. प्रियांकानं हा टॅटू तिच्या वडिलांसाठी काढला आहे. तापसी पन्नूनं पायावर फ्लाइंग गर्लचा टॅटू काढला आहे. तापसीचा हा टॅटू तिचा मनमोकळा स्वभाव दर्शवतो. सोनाक्षी सिन्हानं तिच्या कॉलर बोनवर स्टार चिन्ह असणारा टॅटू काढला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री समंथा रूथ प्रभूनं हाथावर दोन बाण असलेल्या डिझाइनचा टॅटू काढला आहे.