आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सनरायझर्स हैदराबादनं (Sunrisers Hyderabad) चांगली कामगिरी करून दाखवली आहे. केन विल्यमसनच्या (Kane Williamson) नेतृत्वात हैदराबादच्या संघानं पहिले दोन सामने गमावल्यानंतर पुढील चार सामने जिंकत जोरदार कमबॅक केलं आहे. आयपीएलच्या गुणतालिकेत हैदराबादचा संघ पाचव्या क्रमांकावर आहे. हैदराबादचा पुढील सामना 23 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्याशी होणार आहे. हैदराबादच्या संघानं नवीन गाणं लॉन्च केलं आहे. ज्याचा व्हिडिओ राजस्थानच्या संघानं ट्विटरवर शेअर केलं आहे. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात हैदराबादच्या संघाला पहिल्या दोन सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव पत्कारावा लागला होता. त्यानंतर पुढच्या चार सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज, गुजरात टायटन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्जला पराभूत करून जोरदार कमबॅक केलं आहे. हैदराबादचा वेगावान गोलंदाज उमरान मलिकनं उत्कृष्ट गोलंदाजीच्या जीवावर सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या हंगामात त्यानं सहा सामने खेळले आहेत. ज्यात 22.33 च्या सरासरीनं 9 विकेट्स घेतले आहेत. आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी हैदराबादच्या संघानं उमरान मलिकला चार कोटीत रिटेन केलं.