देशातील कोरोना संसर्गात मोठी वाढ झाली आहे देशात गेल्या 24 तासांत 2,527 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे काल भारतात कोरोनाचे 2,380 नवे रुग्ण आणि 56 रुग्णांचा मृत्यू झाला देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 15 हजार 79 इतकी झाली आहे शुक्रवारी दिवसभरात देशात 1656 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे देशात आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 17 हजार 724 रुग्ण कोरोना संसर्गमुक्त झाले देशातील सध्याचा दैनंदिन कोरोना संसर्गाचा दर 0.03 टक्के इतका आहे देशात शुक्रवारी दिवसभरात 19 लाख 13 हजार 296 कोरोना लसी देण्यात आल्या देशव्यापी लसीकरणात आतापर्यंत 187 कोटी 46 लाख 72 हजार 536 कोरोनाच्या लसी देण्यात आल्या आहेत