अभिनेत्री तमन्ना भाटियाने हॉट रेड आऊटफिटमध्ये फोटो शेअर केले आहेत. या लूकमध्ये तमन्नाचा स्टायलिश अंदाज पाहायला मिळत आहे. रेड कॉर्सेट टॉप आणि जीन्स असा तमन्नाचा लूक आहे. हाय पोनी हेअरस्टाईल आणि मॅचिंग लिपस्टिकमध्ये ती फारट स्टनिंग दिसत आहे. अभिनेत्री तमन्ना भाटियाने दक्षिणात्य चित्रपटात प्रसिद्धी मिळवल्यानंतर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची झलक दाखवली. तमन्ना सर्वाधिक मानधन घेणाऱ्या दाक्षिणात्य अभिनेत्रींपैकी आहे. तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे. तमन्नाने आपल्या करिअरची सुरुवात अगदी लहान वयात केली होती. यादरम्यान तिच्या आयुष्यात अनेक चढउतार आले, मात्र तमन्नाने दक्षिणेतील बड्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव समाविष्ट केले. तमन्नाने बॉलिवूट चित्रपटांमध्ये नशीब आजमावले. ती 'हिम्मतवाला' चित्रपटात अजय देवगणसोबत दिसली होती. पण तिचे चित्रपट खास कमाई करु शकले नाहीत. तमन्नाला खरी ओळख सुपरहिट 'बाहुबली' चित्रपटामधून मिळाली. त्यानंतर तमन्नाचा चाहतावर्ग कमालीचा वाढला.