बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या वर्षी सरोगसीच्या माध्यमातून एका सुंदर मुलीचे पालक झाले आहेत. यावेळी मुलगी मालतीसोबत त्यांची पहिलीच दिवाळी होती.



यंदा या जोडप्याने लॉस एंजेलिसमधील आपल्या घरी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला आणि पारंपरिक पद्धतीने पूजा केली. ज्याचे सुंदर फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



अभिनेत्री प्रियांका चोप्रा लग्नानंतर भारतात राहात नसली, तरी प्रत्येक सण ती मोठ्या उत्साहात साजरा करते.



निक जोनास देखील भारतीय रितीरिवाजानुसार सण साजरे करताना दिसत आहे. दिवाळीतही प्रियांका चोप्रा आणि निक जोनास विधीपूर्वक पूजा करताना दिसले.



प्रियंका चोप्राने तिच्या इंस्टाग्रामवरून शेअर केलेल्या फोटोंमध्ये, ती ऑफ-व्हाइट कलरच्या लेहेंगा चोलीमध्ये दिसली आहे आणि अभिनेत्रीने शिफॉनचा लांब श्रग देखील परिधान केला आहे.



तर, निक जोनासने सिल्व्हर मिक्स व्हाईट कुर्ता परिधान केला आहे. यावेळी त्यांची लेक मालतीही आपल्या पालकांसोबत मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसली.



दिवाळीच्या शुभेच्छा शेअर करायला उशीर झाल्याबद्दल प्रियांकाने चाहत्यांची माफीही मागितली आहे.



अभिनेत्रीने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये हे जोडपे पूजा करताना दिसत आहेत, त्यासोबत ते आपल्या मुलीला हातात पकडून फोटो पोज देताना देखील दिसत आहेत.



यावेळी प्रियांका चोप्राची आई मधू चोप्रा देखील उपस्थित होत्या. अभिनेत्रीने यावेळीही तिच्या लेकीचा चेहरा दाखवलेला नाही.