अदिती राव हैदरीचा जन्म 28 ऑक्टोबर 1986 रोजी हैदराबाद येथे झाला. अदितीने मल्याळम चित्रपट 'प्रजापती'मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. आज अदिती राव हैदरीचा 36 वा वाढदिवस आहे. अदिती राव हैदरीनं वयाच्या 21 व्या वर्षी सत्यदीप मिश्रासोबत लग्नगाठ बांधली. 17 व्या वर्षी अदितीची भेट सत्यदीप यांच्यासोबत झाली होती. अदितीने 2013 मध्ये सत्यदीपसोबत घटस्फोट घेतला. अदिती राव हैदरीने तिच्या करिअरमध्ये 'रॉकस्टार', मर्डर-3 'दास देव' आणि 'पद्मावत' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अदितीच्या 'पद्मावत' चित्रपटातील अभिनयाचं अनेकांची कौतुक केलं. अदिती राव हैदरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.