ताजमहालचं नाव आधी होतं काही वेगळंच आग्र्यातील ताजमहाल प्रेमाची निशाणी म्हणून ओळखलं जातं. मुघल बादशाह शहाजहाने बेगम मुमताज महलसाठी ताजमहाल बांधलं होतं. शहाजहा मुघल साम्राज्याचा पाचवा बादशाह होता. बेगम मुमताज महल शहाजहाची सर्वात लाडकी आणि आवडती राणी होती. 14 व्या मुलाला जन्म देताना मुमताज महलचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुमताज महलच्या मृत्यूनंतर शहाजहाने तिची आठवण म्हणून ताजमहाल बांधला. सुरुवातीला या वास्तूचं नाव ताजमहाल नव्हतं. याचं नाव आधी वेगळं होतं. बेगम मुमताज महलची कब्र दफन करताना शहाजहाने याला 'रउजा-ए-मुनव्वरा' असं नाव दिलं होतं. यानंतर याला ताजमहाल हे नाव देण्यात आलं. ताजमहालचे सध्याचे नाव मूळ उर्दू आहे. ताजमहाल शब्दाचा अर्थ मुकुट' म्हणजे ताज आणि अपभ्रंश म्हणून 'महाल' असं याचं नाव पडल्याचं सांगितलं जातं.