बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूने एक नवीन आलिशान कार खरेदी केली आहे. सध्या तापसीच्या या नव्या गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. तपसी पन्नूच्या नव्या लक्झरी कारचं नाव Mercedes-Benz Maybach GLS 600 आहे. तापसीच्या कारची एक्स-शोरूम किंमत जवळपास 2.92 कोटी रुपये आहे. मर्सिडीज-बेंझ लँडमार्क कार्स या इन्स्टाग्राम पेजवरुन तपसी पन्नूच्या नव्या कारचे फोटो शेअर करण्यात आले आहेत. तापसीच्या या नव्या लक्झरी कारमध्ये 4.0 लीटर V8 ट्विन टर्बो इंजिन आहे, जे 550 hp ची पॉवर आणि 730 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते पॉवरफुल इंजिन असलेली ही लक्झरी कार ताशी 250 किलोमीटरचा वेग गाठण्यास सक्षम आहे. तापसी पन्नूने 2012 साली 'चश्मे बद्दूर' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पिंक या चित्रपटामधील तापसीच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केले. तापसी ही शाहरुखच्या डंकी या चित्रपटामधून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे, असं म्हटलं जात आहे.