बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्करच्या घरी लवकरच एका चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे.



. स्वरा आणि तिचा पती फहाद अहमद हे लवकरच आई-बाबा होणार आहेत.



नुकतेच फहादनं मॉम टू बी स्वराला एक खास सरप्राइज दिलं आहे.



फहादनं स्वरासाठी बेबी शॉवर पार्टीचे आयोजन केले होते. बेबी शॉवर पार्टीच्या फोटोमध्ये स्वरा आणि फहाद हे केक कट करताना दिसत आहेत.



बेबी शॉवर पार्टीचे फोटो स्वरानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



स्वरानं हे बेबी शॉवर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन कॅप्शनमध्ये लिहिलं, 'गेल्या आठवड्यात, माझ्या सर्वात जुन्या मित्रांपैकी एक समर नारायण आणि लक्षिता यांनी आणि फहादने मला बेबी शॉवरच्या रूपात सर्वात गोड सरप्राईज दिले'



स्वरानं शेअर केलेल्या बेबी शॉवर पार्टीच्या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.



सोशल मीडियावर खास फोटो शेअर करुन स्वरा आणि फहाद यांनी गुडन्यूज दिली.



स्वरा भास्करने ही गुडन्यूज दिल्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या.



स्वरा तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.