अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख हे दोघे एकमेकांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करतात. रितेश आणि जिनिलिया यांनी नुकतेच त्यांचे स्टायलिश लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. रितेश आणि जिनिलिया यांनी नुकतेच एक खास फोटोशूट केले. जिनिलियानं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसली. ब्लॅक कोट, ब्लॅक पँट व्हाईट टॉप अशा लूकमधील फोटो जिनिलियानं शेअर केले आहेत. तर अभिनेता रितेश देशमुखनं देखील त्याच्या स्टायलिश लूकमधील फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये रितेश हा ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसला. रितेशच्या या स्टायलिश लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे. रितेश आणि जिनिलिया यांच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. रितेश आणि जिनिलिया यांच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.