अभिनेत्री रवीना टंडननं अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.



रवीनानं 1992 मध्ये रिलीज झालेल्या ‘पत्थर के फूल’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.



जय हिंद, बडे मियाँ छोटे मियाँ, अँटी नंबर वन या चित्रपटांमध्ये रवीनानं प्रमुख भूमिका साकारली.



केजीएफ चॅप्टर-2 या चित्रपटामध्ये देखील रवीनानं महत्वाची भूमिका साकारली.



आता लवकरच रवीनाचा वेलकम-3 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.



रवीनाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.



अंदाज अपना अपना आणि 'मोहरा' यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.



रवीनाचे मोहरा चित्रपटातील 'टिप टिप बरसा पानी' हे आयकॉनिक गाणे आजही लोक आवडीनं बघतात.



रवीना तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.



काही महिन्यांपूर्वी रवीनाला सिनेसृष्टीतील योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्काराने (Padma Shri Award) सन्मानित करण्यात आले होते.