पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला.



इंग्लंडने पाकिस्तानवर 5 गडी राखून रोमहर्षक विजय मिळवला.



नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेतलेल्या इंग्लंडने अवघ्या 137 धावांमध्ये पाकिस्तानला रोखलं.



पण पाकिस्ताननेही भेदक गोलंदाजी करत कडवी झुंज दिली.



पण बेन स्टोक्सने एकहाती झुंज देत नाबाद 52 धावा करत 5 गडी राखून इंग्लंडला विजय मिळवून दिला.



पाकिस्तानकडून कर्णधार बाबरने 32 तर शान मसूदने सर्वाधिक 38 धावा केल्या.



या विजयासह 2010 नंतर पुन्हा एकदा इंग्लंडने टी20 विश्वचषक जिंकला आहे.



सर्वाधिक टी20 विश्वचषक मिळवण्यात वेस्ट इंडिजसोबत इंग्लंडही आता पहिल्या स्थानी विराजमान आहे.



सामन्यात विजयाचा शिल्पकार ठरलेल्या स्टोक्सची सर्वत्र वाह वाह होत आहे.



सामनावीर म्हणून अप्रतिम गोलंदाजी करणाऱ्या सॅम करनला गौरवण्यात आलं