भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 विकेट्सने पराभव पत्करावा लागला. दक्षिण आफ्रिकेनं आज दमदार गोलंदाजीचं दर्शन घडवलं. भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर भारतानं फलंदाजीला येत 133 धावाचं लक्ष्य दक्षिण आफ्रिकेसमोर ठेवलं. भारताची सुरुवातच खराब झाली सलामीवीरापासून निम्मा संघ 50 धावा होण्याच्या आतच तंबूत परतला. सूर्यकुमारने 40 चेंडूत 68 धावा केल्या ज्यामुळे भारताने 133 धावांपर्यंत मजल मारली. ज्यानंतर 134 धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात आलेल्या भारताची सुरुवात उत्तम झाली. भारताकडून दुसरी ओव्हर टाकताना अर्शदीपने दोन महत्त्वाचे विकेट्स घेतले. 6 ओव्हरमध्ये 24 रनांवर दक्षिण आफ्रिकेचे 3 गडी बाद झाले होते. पण त्यानंतर मार्करम आणि डेविड मिलरने दमदार भागिदारी करत दक्षिण आफ्रिकेला विजयाजवळ नेलं. मार्करमने 52 तर मिलरने नाबाद 59 रन करत भारताला विजय मिळवून दिला.