लिंबाच्या रसात मीठ घालून ते हातापायाला चोळावे त्यामुळे घाम येण्याचे प्रमाण कमी होते.
कच्च्या बटाट्याच्या स्लाईस कापून हातावर चोळा आणि मग थंड पाण्याने हात-पाय स्वच्छ धुवा.
रोज किमान १ वेळातरी टोमॅटो रस हातापायाला लावा.
हातापायाला वेळोवेळी मॉयश्चरायझर लावा.
हातपाय पुसण्यासाठी सुती कापडाचा वापर करावा.
रोज रात्री झोपताना खोबऱ्याचे तेल हातापायाला चोळून झोपावे त्यामुळे त्वचा मऊ राहते आणि घाम येत नाही.
दररोज भरपूर पाणी प्यावे जेणेकरून तुमचे शरीर हायड्रेट राहते आणि हातापायाला घाम येणार नाही.
काळ्या चहाच्या गरम पाण्याने हातापायाला शेक द्या, त्यामुळे हातापायाला आराम मिळतो.
घराबाहेर पडताना हातापायालाही सनस्क्रीन लावा.
बेकिंग सोड्याची पेस्ट हातापायांना लावा आणि काही काळ ठेवा त्यानंतर स्वच्छ पाण्याने हात-पाय धुवा.