मूगडाळीमध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळते त्यामुळे आपली हाडे मजबूत राहतात.
मूग डाळीमध्ये अँटिऑक्सिडंट् घटक असतात, त्यामुळे शरीराचे फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण होते.
शरीराची रोग प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी मूग डाळीचे सेवन करणे उत्तम ठरते.
मूग डाळीमध्ये असलेले गुणधर्म रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवतात.
मूग डाळ खाल्ल्याने बद्धकोष्ठता, गॅस या पोटा संबंधित समस्या कमी होतात.
रोजच्या आहारात मूगडाळीचे सेवन केल्यास चेहऱ्यावरील मुरुम, काळे डाग, सुरकुत्या कमी होतात.
मूग डाळ खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
मूग डाळीच्या सेवनाने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास होते.
मूग डाळीमधील पोषक घटक आपले ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवतात.
मूग डाळीत कॅलरीज कमी असतात, त्यामुळे शरीरातील अतिरिक्त चरबी वाढत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.