अभिनेत्री स्वरा भास्कर ही फहाद अहमदसोबत विवाहबद्ध झाली.
फहाद हा सामाजिक कार्यकर्ता असून समाजवादी पक्षाची युवक आघाडी असलेल्या समाजवादी युवजन सभा या संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष आहे
स्वरानं नुकतेच फहादसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
तिनं या फोटोला खास कॅप्शन देखील दिलं आहे.
स्वरानं फहादसोबतचे फोटो ट्विटरवर शेअर केले.
या फोटोला तिनं कॅप्शन दिलं, 'थ्री चीअर्स फॉर स्पेशल मॅरेज अॅक्ट. ते अस्तित्वात आहे
आणि ते प्रेमाला संधी देते.' स्वराच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
स्वरानं दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिलं, 'कुटुंब, मित्रांच्या प्रेमाने आणि त्यांच्या पाठिंब्यानं आनंद मिळाला.
माझ्या आईची साडी आणि तिचे दागिने घातले. आम्ही स्पेशल मॅरेज अॅक्टच्या अंतर्गत नोंदणी केली.
आता धुमधडाक्यात लग्न करण्याची तयारी करत आहोत
स्पेशल मॅरेज अॅक्ट 1954 मध्ये आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह करण्यास परवानगी दिली जाते.
स्वरानं लग्नाचे हे फोटो शेअर केल्यानंतर अनेकांनी स्वरा आणि फहाद यांना शुभेच्छा दिल्या.