ओटीटी प्लॅटफॉर्मवरील विविध विषयांवर आधारित असणाऱ्या वेब सीरिज आणि चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळते.
ओटीटी रिलीज झालेल्या सीरिज अनेक लोक बिंच वॉच करतात. या वीकेंडला काही खास चित्रपट आणि वेब सीरिज तुम्ही ओटीटीवर पाहू शकतात.
ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनिरुद्ध रॉय चौधरी दिग्दर्शित 'लॉस्ट' या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत होते. यामी गौतमने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे.
'लॉस्ट' हा उत्कृष्ट चित्रपट 16 फेब्रुवारी रोजी झी-5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.
कार्निव्हल रो 2 ही सीरिज 15 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस आली. कार्निव्हल रो-2 च्या पहिला सिझनला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली होती.
अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही कार्निव्हल रो 2 सीरिज पाहू शकता.
'अ गर्ल अँड एन अॅस्ट्रोनॉट' या सीरिजमध्ये प्रेक्षकांना एक खास लवस्टोरी बघता येणार आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही ही वेब सीरिज पाहू शकता.
लकी लक्ष्मण या चित्रपटाला आयएमडीबीवर 8.2 एवढे रेटिंग मिळाले आहेत.
टॉलिवूडचा हा चित्रपट अहा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 17 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे.
'वाळवी' हा सर्वोच्च रेटिंग प्राप्त झालेला मराठी चित्रपट आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनी या फिल्मला सारखीच दाद दिली.