दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अशोक सेल्वन आणि मुलगी अभिनेत्री कीर्ती पांडियन (Keerthi Pandian) यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे. अशोक आणि कीर्ती गेल्या काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. आता या दोघांनी लग्नगाठ बांधली आहे. अशोक आणि कीर्ती यांच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अशोक सेल्वन आणि कीर्ती पांडियन यांचा लग्न सोहळा मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत पार पडला. तिरुनेलवेली येथे अशोक सेल्वन आणि कीर्ती पांडियन यांचा विवाह सोहळा पार पडला. कीर्ती आणि अशोक यांनी त्यांच्या लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी या फोटोला कॅप्शन दिलं. 'आमचे हृदय प्रेमामध्ये मिसळले आहे' कीर्तीची चुलत बहीण असणारी अभिनेत्री रम्या पांडियन तिने कीर्ती आणि अशोक यांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कीर्ती आणि अशोक यांनी त्यांच्या विवाह सोहळ्यासाठी खास लूक केला होता. कीर्ती आणि अशोक यांनी विवाह सोहळ्यामध्ये ऑफ व्हाईट कलरचे आऊटफिट परिधान केले होते. कीर्तीनं विवाह सोहळ्यासाठी ऑफ व्हाईट साडी आणि गोल्डन ज्वेलरी असा लूक केला होता.