सुयश आणि आयुषीची पहिली संक्रांत सुयश टिळक आणि आयुषी भावे यांचा नुकताच लग्न सोहळा पार पडला आता या दोघांनी त्यांच्या पहिल्या संक्रांतीचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. या फोटो मध्ये आयुषी आणि सुयश दोघांनी हलव्याचे दागिने परिधान केलेले दिसतायत. दोघांनी काढलेल्या सेल्फीवर चाहत्यांनी लाईक्स आणि कॉमेंट्सचा वर्षाव केलाय. सुयश आणि आयुषीचे लग्नानंतरचे देवदर्शनासाठी गेलेले फोटो व्हायरल झाले होते. हे फोटो शेअर करत या दोघांनी आपल्या चाहत्यांना मकर संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.