खणाच्या साडीत खुललं मंजिरीचं सौंदर्य; पाहा फोटो अभिनेते, दिग्दर्शक प्रसाद ओक आणि मंजिरी ओक हे मराठी चित्रपटसृष्टीतील आदर्श जोडपं म्हणून ओळखलं जातं. मंजिरी ओक ऑनस्क्रीन जरी सक्रिय नसली तरी पडद्यामागे ती सक्रिय असते. मंजिरी सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. मंजिरीने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये मंजिरीचा खण साडीतील लूक नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय.