'बिग बॉस मराठी' फेम सईचं नवं फोटोशूट; पाहा फोटो 'बिग बॉस मराठी' या रिअॅलिटी शोमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सई लोकूर निखळ हास्य आणि सौंदर्याच्या जोरावर सईने अनेकांची मनं जिंकली. 2015 साली प्रदर्शित झालेल्या ‘किस किसको प्यार करु’ या हिंदी चित्रपटात देखील सई झळकली होती. या चित्रपटात कॉमेडी किंग कपिल शर्मा देखील होता. सईने या चित्रपटात कपिलच्या पत्नीची भूमिका साकारली होती. सई इन्स्टाग्राम अकाऊंटवर विविध फोटो व व्हिडिओ पोस्ट करत चाहत्यांच्या सतत संपर्कात असते. अभिनेत्री सई लोकूर ही आपल्या फोटोशूटमुळे सोशल मीडियावर खूपच चर्चेत असते.