बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन सध्या चर्चेत आहे. सुष्मिताला गेल्या काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुष्मिता पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली आहे. मुंबईत होत असलेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये सुष्मिता सहभागी झाली होती. 'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये सुष्मिताने अनुश्री रेड्डीने डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता. 'लॅक्मे फॅशन वीक'च्या मंचावर रॅम्प वॉक करताना सुष्मिता खूपच आनंदी दिसून आली. सुष्मिताचा रॅम्स वॉक करतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुष्मिताचा 'ताली' हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'लॅक्मे फॅशन वीक'मध्ये सुष्मिताने आपल्या अदाकारीने सर्वांना घायाळ केलं आहे. सुष्मिता सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे.