बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा आज वाढदिवस आता जरी आपल्यात तो नसेल पण त्याच्या आठवणी कधीच विसरता येणार नाहीत आज सुशांतचा वाढदिवसानिमित्ताने त्यांचे करोडो चाहते त्यांची आठवण काढत आहेत 21 जानेवारीला पाटणा येथे जन्मलेल्या सुशांतने मिळवलेली प्रसिद्धी हे प्रत्येकाचे स्वप्न असते. सुशांतसिंह राजपूतचा टीव्ही ते बॉलिवूडपर्यंत प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे पटना सारख्या शहरातून मुंबईत येणं आणि बॉलिवूडमध्ये आपली स्वत:ची वेगळी ओळख सुशांतने निर्माण केली होती सुशांतने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर वेगळी छाप पाडली चाहत्यांच्या मनातील सुशांत सिंह राजपूतची जागा कायम तशीच राहील