सुशांतसिंह राजपूतचा टीव्ही ते बॉलिवूडपर्यंत प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
पटना सारख्या शहरातून मुंबईत येणं आणि सर्वाचं आकर्षण असणाऱ्या बॉलिवूडमध्ये आपली स्वत:ची वेगळी ओळख सुशांतने निर्माण केली होती.
सुशांतसिंह राजपूतने टीव्ही सीरियल्समधून आपल्या कारकिर्दिला सुरुवात केली होती.
'किस देश मे है मेरा दिल' या स्टार प्लसवरील मालिकेत 2008 साली सुशांत पहिल्यांदा अभिनेता म्हणून झळकला होता.
टीव्हीनंतर 2013 साली 'काय पो चे' या सिनेमातून सुशांतसिंह राजपूतने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. या सिनेमासाठी त्याला फिल्मफेअरचं सर्वोत्कृष्ट डेब्यू अभिनेत्याचं नॉमिनेशनही मिळालं होतं.
त्यानंतर सुशांतचा 'पीके' हा सर्वाधिक कमाई करणार सिनेमा ठरला होता. या सिनेमात सुशांत सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसला होता.
सुशांतसिंग राजपूतच्या कारकीर्दितील सर्वात हिट सिनेमा महेंद्रसिंह धोनीवरील बायोपिक 'एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी' होता.
या चित्रपटाच्या अभिनयासाठी सुशांतला सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी पहिला फिल्मफेअर पुरस्काराचं नॉमिनेशन मिळालं होतं.