महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेला महिलांचं खेळाडूंचं आयपीएल म्हटलं जातं. (Photo Credit: IPL)



2022 मध्ये ही स्पर्धा शेवटच्या वेळी आयोजित केली जात आहे. (Photo Credit: IPL)



आयपीएलच्या धर्तीवर पुढील वर्षीपासून महिला आयपीएलचे आयोजन केलं जाणार आहे, ज्यात 6 संघ सहभागी होणार आहेत. (Photo Credit: IPL)



भारतात महिला टी-20 चॅलेंजला यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला, ज्यावेळी बीसीसीआयनं सहा संघाची महिला आयपीएल स्पर्धा खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला. (Photo Credit: IPL)



दरम्यान, 2019 मध्ये केवळ एका सामन्यासह टी-20 चॅलेंज स्पर्धेला सुरुवात झाली. त्यानंतर 2019 आणि 2020 तीन संघाची स्पर्धा बनली. ही स्पर्धा त्यांच्या अंतिम आवृत्तीसाठी सज्ज आहे. या हंगामातील पहिला सामना आज (23 मे) खेळला जाणार आहे. (Photo Credit: IPL)



ट्रेलब्लेझर्स संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे. तर, ट्रेलब्लेझर्सचं कर्णधारपद स्मृती मानधनाकडं सोपवण्यात आलं आहे. (Photo Credit: IPL)



हरमनप्रीत कौर आणि स्मृती मानधना यांच्या नेतृत्वाखाली सुपरनोव्हास आणि ट्रेलब्लेझर्स दोन्ही संघ आमने- सामने येणार आहेत. (Photo Credit: IPL)



पुण्याच्या महाराष्ट्र असोसिएशन क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. (Photo Credit: IPL)



या स्पर्धेतील दुसरा सामना सुपरनोव्हास आणि व्हेलोसिटी यांच्यात खेळला जाणार आहे. (Photo Credit: IPL)



अखेरचा साखळी सामना व्हेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स यांच्यात रंगणार आहे. (Photo Credit: IPL)