बिग बॉस 15 नंतर तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्यातील जवळीक वाढत चालली आहे. त्यांची जोडी रोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांची बॉन्डिंग पुन्हा एकदा लोकांची मने जिंकताना दिसली आहे. खरं तर, काही तासांपूर्वी तेजस्वी बॉयफ्रेंड करणला घेण्यासाठी विमानतळावर पोहोचली होती. यादरम्यान ती फोटोग्राफर्ससोबत धमाल-मस्ती करताना दिसली. करण कुंद्राचे आगमन होताच तिने त्याचे जोरदार स्वागत केले. यादरम्यानचे व्हिडीओ पाहून लोक तेजस्वी प्रकाशला बेस्ट गर्लफ्रेंड म्हणत आहेत. विमानतळावरून तेजस्वी प्रकाशचे दोन नवीन व्हिडीओ समोर आले आहेत, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये तेजस्वी प्रकाश तिच्या कॅमेऱ्याने पापाराझींचे फोटो क्लिक करत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये तिचा आनंद पाहायला मिळत आहे.