हार्दिक पांड्याची पत्नी नताशा सोशल मीडियावर तुफान सक्रिय नताशा कायम हटके फोटोशूट करत असते. आताही तिने काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ब्लॅक कलरच्या ड्रेसमधील हे फोटो चाहत्यांना बरेच आवडत आहे. फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. नताशा कायमच विविध लूक्समध्ये फोटो पोस्ट करत असते. ती पती हार्दिक आणि मुलगा अगस्त्यसोबतही फोटो शेअर करते. हार्दिकचे सामने पाहायला नताशा आवर्जून मैदानात जाते. याठिकाणी देखील ती फोटोज काढत असते. नताशाच्या गुजरात संघाच्या सामन्यावेळीच्या रिएक्शन बऱ्याच व्हायरल होतात.