आयपीएलचा पंधराव्या हंगामात पंजाब किंग्जला काही खास कामगिरी करता आली नाही. आयपीएल 2022 मधील अखेरचा साखळी सामना सनरायजर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात खेळला गेला. सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सामन्यात पंजाबचा सलामीवीर शिखर धवननं नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम शिखर धवनच्या नावावर नोंदवण्यात आला आहे. याबाबतीत त्यानं विराट कोहली, डेव्हिड वार्नर, रोहित शर्माला आणि सुरेश रैनाला मागं टाकलं आहे. हैदराबादविरुद्ध सामन्यात शिखर धवननं 39 धावांची खेळी केली. ज्यात त्यानं दोन चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. आयपीएलमध्ये शिखर धवननं 206 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 701 चौकार आणि 136 षटकार मारले आहेत. आयपीएलमध्ये शिखर धवननं सहा हजार धावांचाही टप्पा गाठला आहे. अशी कामगिरी करणारा शिखर दुसरा क्रमांकावर आहे. आयपीएलमध्ये शिखर धवननं 14 सामन्यात 38.33 च्या सरासरीनं 460 धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-20 मालिकेत शिखर धवनला संधी मिळाली आहे.