कोकम पाण्यात टाकून त्याचा काढा करून प्यायल्यास अपचन दूर होते. उन्हाळ्याच्या दिवसात कोकम सरबत हा एक खूप चांगला पर्याय आहे. अतिसार आणि रक्ताचे जुलाब हे पोटात मुरडा येऊन होत असतील तर कोकम कुसकरून गाळलेले पाणी प्यावे. अंगावर पित्त उठले असल्यास कोकमचा गर संपूर्ण अंगास लावावा. कोकम तेलाचा उपयोग हा विविध प्रकारचे मलमे बनविण्यासाठी केला जातो. पोटात कळ येऊन आव पडत असल्यास कोकमचे तेल भातावर घालून तो भात खावा. मूळव्याधीचा त्रास होत असेल तर कोकमचा गर दह्यावरच्या निवळीत कालवून ती निवळी प्यावी आहारामध्ये कोकमचा नियमितपणे वापर केल्यास आम्लपित्त, भूक मंद होणे, अपचन इ. तक्रारी दूर होतात हातापायांची उष्णतेमुळे आग होत असेल तर कोकमचे तेल संपूर्ण अंगाला चोळावे, यामुळे दाह कमी होते. हिवाळ्यात थंडीमुळे ओठ फुटणे किंवा त्वचा कोरडी पडून भेगा पडणे यासाठी कोकमचे तेल कोमट करून लावावे.