सर्वप्रथम जागा किती आहे, हे पाहूनच कोणती झाडे लावावीत हे ठरवावे.

कमी जागेत खूप झाडे लावल्यास झाडांचे पोषण होणार नाही.

घरासमोर झाड लावण्यास जागा नसल्यास खिडकीत कुंडीमध्ये झाड लावावे.

जाई, गुलाबासारखी फुलझाडे कुंडीत सहज लावता येतात.

उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हामुळे झाडांची पाण्याची गरज वाढते.

उन्हाळ्यात कुंड्यांमधील झाडांना दोनदा पाणी द्यावे.

पाणीसाठवणीच्या भांड्यातून पाइपद्वारे झाडांसाठी पाण्याची व्यवस्था करावी.

झाडांच्या कुंडीतला मातीचा ओलावा कायम राहील याची नेहमी काळजी घ्यावी.

झाडांचे रोगांपासून संरक्षण करण्यासाठी औषध फवारणी करावी.

१०

झाडांच्या वाळलेल फांद्या, पाने आणि फुले वेळोवेळी काढून झाडे सुदृढ ठेवावी.