सनीने 76 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये चमकदार पदार्पण केल्याने ती चर्चेचा विषय ठरत आहे.
तिच्या आकर्षक फॅशन प्रतिष्ठित कान्स रेड कार्पेट वर सनी लिओनीने पुन्हा एकदा सगळ्यांची मन जिंकली आहेत.
प्रतिभावान अभिनेत्रीने तिच्या बहुप्रतिक्षित चित्रपट केनेडी च्या प्रमोशनसाठी कान्स मध्ये सहभागी होत आहे
ज्याला या वर्षी मिडनाईट स्क्रिनिंगसाठी आदरणीय कान्स ज्युरीने निवडलेला एकमेव भारतीय चित्रपट असण्याचा उल्लेखनीय गौरव बहाल केला आहे.
सनी लिओनीने तिच्या उत्तम फॅशन आणि ग्लॅमरस लूक ने सगळ्यांची मन जिंकून घेतली.
तिचे क्लासिक ब्लॅक-अँड-व्हाइट कॉम्बिनेशन ने अफलातून दिसतेय
प्रसिद्ध डिझायनर गेमी मालोउफ यांच्या ब्लॅक ऑफ-शोल्डर क्रॉप टॉपसह बिसीबीजीमॅक्सअझीरिया या प्रतिष्ठित ब्रँडच्या स्लीक व्हाईट पँटसह हा खास कॉस्च्युम तयार करण्यात आला.
मनोरंजनाच्या जगात सनी लिओनीची चढाई काही कमी नाही आणि तिचे एकनिष्ठ चाहते भारतात केनेडी च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत.
तिच्या आगामी प्रोजेक्ट्स मध्ये अनेक गोष्टी आहेत आणि त्या लवकरच सगळ्या समोर येणार आहेत.
सनी तिच्या प्रतिभा आणि अतुलनीय करिष्माने जगभरातील प्रेक्षकांना मोहित करत आहे.