आकाश ठोसर रमला शेतीच्या कामात....
अभिनेता आकाश ठोसरला 'सैराट' या सिनेमाच्या माध्यमातून चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे
गेल्या काही दिवसांपूर्वी त्याचा 'घर बंदूक बिरयानी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला.
आता आकाश ठोसरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडीओमध्ये आकाश ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे.
आकाश ठोसरने ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ शेअर करत 'नाद', असं कॅप्शन लिहिलं आहे.
आकाशने सध्या त्याच्या कामातून ब्रेक घेतला असून तो आता गावी शेतीच्या कामात रमला आहे.
ट्रॅक्टर चालवण्याचं कामदेखील तो करत आहे.
आकाशला ट्रॅक्टर चालवताना पाहून त्याच्या चाहत्यांचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे.
चाहते कमेंट्स करत त्याचं कौतुक करत आहेत.