दाक्षिणात्य अभिनेत्री किर्ती सुरेश सध्या चर्चेत आहे.
अभिनेत्री किर्ती सुरेश लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.
उद्योगपती फरहान बिन लियाकतसोबत किर्ती लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा होती.
अभिनेत्रीने आता ट्वीट करत लग्नाच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.
किर्तीने ट्वीट केलं आहे की,हाहाहा! असं काही नाही आहे...माझ्यासोबत माझ्या मित्राचं नाव उगाचं जोडणं चुकीचं आह... ज्यावेळी मी लग्न करणार असेल त्यावेळी होणाऱ्या पतीबद्दल तुम्हाला नक्की माहिती देईल. पण तोपर्यंत शांत राहा.
किर्ती सुरेशला 'दसरा' या सिनेमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.
किर्तीचा 'मामन्न' हा सिनेमा लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
किर्तीच्या 'भोलाशंकर' या सिनेमाचीदेखील चाहत्यांना उत्सुकता आहे.
सायरन', र'घु थाथा' आणि 'रिवॉल्वर रीटा' हे किर्तीचे आगामी सिनेमे आहेत.
किर्ती सुरेशला अल्पावधीतच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत चांगलीच लोकप्रियता मिळाली आहे.