बारामतीत सुनेत्रा पवार यांचे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले होते. बिरजू मांढरे यांनी वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित केले होते. या बॅनर मधून पुन्हा एकदा त्यांच्या उमेदवारीची चर्चा रंगू लागली आहे. सुनेत्रा पवार राज्यातील पावरफुल घराण्यातील पावरफुल सुनबाई. भाजपने मिशन बारामती हाती घेतलं. बारामती लोकसभा मतदारसंघातून त्या उभा राहणार अशी चर्चा सुरू झाली. सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजपाने पवार घरातील कुणालातरी उमेदवारी द्यायचे असे ठरवले असल्याची चर्चा. वारजे भागात सुनेत्रा यांचे वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना संसदेचे चित्र असलेला बॅनर लागला. सुनेत्रा पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशी चर्चा सुरू झाली आहे.