राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आले आहे. छगन भुजबळ यांना सिद्धगड हा बंगला देण्यात आला आहे. तर दिलीप वळसे पाटलांना सुवर्णगड बंगला मिळाला आहे. हसन मुश्रीफ यांना विशालगड बंगला देण्यात आला आहे. धनंजय मुंडे यांना प्रचितगड हा बंगला मिळाला आहे. धर्मरावबाबा आत्रम यांना सुरुचि -3 हा बंगला देण्यात आला आहे. अनिल पाटील यांना सुरुचि 8 हा बंगला देण्यात आला आहे. संजय बनसोडो यांना सुरुचि 18 बंगला देण्यात आला आहे. आदिती तटकरे यांना अद्याप बंगला मिळालेला नाही.