पंतप्रधान मोदींविरोधातील अवमानकारक वक्तव्य प्रकरणी राहुल गांधींवर मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता.



या प्रकरणी राहुल गांधींना 5 डिसेंबरपर्यंत हायकोर्टाने दिलासा कायम ठेवला आहे.



महेश श्रीश्रीमल यांनी गिरगाव कोर्टात राहुल गांधींविरोधात खटला दाखल केला होता.



यानंतर राहुल गांधींना समन्स जारी करण्यात आले होते.



यानंतर समन्स रद्द करून कारवाईला स्थगिती देण्याची मागणी राहुल गांधींनी हायकोर्टाकडे केली होती.



तक्रार निव्वळ राजकीय स्वार्थापोटी दाखल झाल्याचा राहुल गांधींचा दावा आहे.



महेश श्रीश्रीमल यांना लोकसेवकाविरोधात तक्रार करण्याचा अधिकार नसल्याचं राहुल गांधींच्या वकिलांनी म्हटलं.



दोन्ही बाजूंवर महाधिवक्ता बिरेंद्र सराफ राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करणार आहेत.



यासाठी बीरेंद्र सराफ यांनी मुदत मागितली आहे.



तूर्तास 5 डिसेंबरपर्यंत गिरगाव दंडाधिकारी कोर्टातील खटल्यावर स्थगिती कायम आहे.



पंतप्रधान मोदींना चौकीदार चोर है आणि 'चोरोंके सरदार' असं राहुल गांधींनी म्हटल्याचं भाजप म्हणत आहे.