एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांनी विरोधकांच्या यशवंत सिन्हा यांचा पराभव करत देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपदी होण्याचा मान मिळवला आहे.



सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चित्रकार सुमन दाभोलकर यांनी द्रौपदी मुर्मू यांचं स्टोन आर्ट साकारलं आहे.



राष्ट्रपती म्हणून निवड झाल्यानंतर सुमन दाभोलकर यांनी स्टोन आर्ट साकारत आगळ्यावेगळ्या पद्धतीने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.



हे चित्र दगडावर साकारण्यात आलं असून



दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार देण्यात आला असून



नैसर्गिकरित्या नदीत सापाडलेल्या दगडावर हे चित्र साकारलं आहे.



राष्ट्रपतीपदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असतील.



द्रौपदी मुर्मू या 24 जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील.



देशाचे सध्याचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाल 24 जुलै रोजी समाप्त होणार आहे.



द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपुर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.