आपण अनेक प्रकारचे हॉटेल्स पाहतो. कुठं बुलेट थाळी तर कुठे वेगवेगळ्या स्किमा असतात.

पुणेकर यात आघाडीवर असतातच. मात्र थरार अनुभवत तुम्ही कधी जेवणाचा आस्वाद घेतलाय का?

अन् असं कोणी वेडं धाडस केलं असेल तर तो स्वतःच्या जीवावर उदार झाला असेल.

अन् असं कोणी वेडं धाडस केलं असेल तर तो स्वतःच्या जीवावर उदार झाला असेल.

पण तुम्ही हे अनुभवू शकता ते ही सुरक्षितरीत्या.

पण तुम्ही हे अनुभवू शकता ते ही सुरक्षितरीत्या.

आज आम्ही तुम्हाला एक अशा हॉटेलबद्दल सांगणार आहोत.

आज आम्ही तुम्हाला एक अशा हॉटेलबद्दल सांगणार आहोत.

जे महाराष्ट्रात तुम्ही कुठं पाहिलं ही नसेल, अनुभवलं ही नसेल.

 पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी लगतच्या कासारसाई धरणावर हे हॉटेल आहे.

 पिंपरी चिंचवड आणि हिंजवडी लगतच्या कासारसाई धरणावर हे हॉटेल आहे.

हॉटेलमध्ये गेल्यावर खुर्चीवर खवय्ये बसलेले दिसतात पण खवय्यांना सीट बेल्ट लावला जातो.

हॉटेलमध्ये आलेत, खुर्चीवर बसलेत मग सीटबेल्ट कशासाठी? याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या काही सेकंदात मिळतं.

कारण तुम्ही बसलेली खुर्ची आणि टेबल थेट 120  फूट उंचीवर पोहोचतो अन् मग दिसतो 360 डिग्री हा व्ह्यू आहे. या हॉटेलला स्काय डायनिंग असं म्हटलं जातं.