बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे गेली काही वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. अर्जुननं मुंबईमध्ये मलायकाच्या घराजवळचा फ्लॅट खरेदी केला होता. आता हाच फ्लॅट विकण्याचा निर्णय अर्जुननं घेतला आहे. 2021 मध्ये अर्जुननं मुंबईमधील वांद्रे भागामध्ये एक फ्लॅट अर्जुननं खरेदी केला होता. 4BHK चा हा फ्लॅट अर्जुननं 20 कोटीला खरेदी केला होता. गर्लफ्रेंड मलायका अरोरा राहते त्याच बिल्डिंगमध्ये अर्जुनचा हा फ्लॅट होता. केसी मार्गावरील 81 ऑरिएट इमारतीच्या 19व्या मजल्यावर असणारा अर्जुनचा हा फ्लॅट 4364 स्क्वेअर फूट होता. पोर्ट्सनुसार अर्जुनने आपला फ्लॅट 16 कोटींना विकला आहे. सेल डॉक्यूमेंट्ची नोंदणी 19 मे रोजी झाली. अर्जुनची बहीण अंशुलाने सेलच्या डॉक्यूमेंट्वर सही केली. सध्या अर्जुन हा जुहूमधील रहेजा ऑर्चिडच्या सातव्या मजल्यावर राहात आहे. लवकरच अर्जुनचा ‘एक व्हिलन रिटर्न्स’हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.