ऊसाचा (Sugarcane) रस हे आरोग्यदायी पेय मानले जाते. डिहायड्रेशनची समस्या देखील ऊसाच्या रसामुळे कमी होण्यात मदत होते. ऊसाच्या रसामध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, जीवनसत्त्वे, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते. ऊसाचा रस प्यायल्याने तुम्हाला झटपट ऊर्जा मिळू शकते. हे पेय खूप कमी वेळात तुमचा थकवा दूर करते. काविळीवर ऊस हा एक उत्तम उपाय आहे. ऊसाच्या रसामध्ये विविध अँटिऑक्सिडंट असतात, जे लिव्हरला संसर्ग होण्यापासून वाचवतात. ऊसाचा रस पचनाच्या समस्यांवर टॉनिक म्हणून काम करतो. तुम्हाला बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. ऊसाचा रस स्त्रियांमध्ये ओव्हुलेशनच्या समस्या कमी करतो.