रकुल प्रीत सिंह बॉलीवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रकुल प्रीत सिंहच्या 'अटॅक' सिनेमाला प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता. रकुल प्रीत सिंहने ‘मरजावाँ’, ‘शिमला मिर्ची’, ‘सरदार का ग्रँडसन’ यांसारख्या सिनेमांत काम केले आहे. रकुल प्रीत सिंहचा ‘रनवे 34’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला होता. या सिनेमात रकुल अजय देवगण आणि अमिताभ बच्चनसोबत दिसून आली होती. ‘डॉक्टर जी’, ‘थँक गॉड’, ‘आयलन’, ‘छत्रीवाली’ हे रकुलचे आगामी सिनेमे आहेत. रकुल अनेकदा तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. रकुल प्रीत सिंहचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. रकुलचे स्टायलिश फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरत आहेत. रकुलचे अनेक प्रोजोक्ट पाईपलाईनमध्ये आहेत.