ओवा बहुतेक भारतीय घरांमध्ये वापरला जातो. ओवा खूप उष्ण असतो, त्यामुळे बहुतेक लोक फक्त हिवाळ्यातच ओव्याचा आहारात समावेश करतात. मात्र ओव्याचा वापर उन्हाळ्यातही फायदेशीर ठरतो. ओव्याचे सेवन करत असाल तर तुमच्या पोटात रोगाचे जंतू पोहोचल्यानंतरही तुमचं नुकसान करू शकत नाहीत. जेवणानंतर दिवसातून एकदा एक चतुर्थांश चमचा ओवा पाण्यासोबत खाल्याने पचन सुधारते. ओवा तुमचे पोट आणि पचन तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयोगी आहे. ओव्याची दोन पाने घेऊन रोज जेवणानंतर चिमूटभर काळ्या मीठासह चावून खावीत. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.