बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या हॉलिवूड डेब्यूमध्ये व्यस्त आहे.

याबाबत तिने स्वतः चाहत्यांना सांगितले आहे.

तिने इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो पोस्ट केरून याबाबत माहिती दिली आहे.

आपण आता हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये असल्याचे आलियाने सांगितले आहे.

आलिया नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. वेगवेगळ्या पोझमधी फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

आता तिने असाच एक फोटो शेअर केला आहे, ज्यात ती गार्डन परिसरात उन्हात बसलेली आहे. यासोबतच एक कॅप्शनही लिहिले आहे, ज्यावर अर्जुन कपूरने कमेंट्स केली आहे.

आलिया भट्टने इंस्टाग्रामवर तीन फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये दिसत आहे की, ती पाय वर करून पडली आहे.

ती मोकळ्या आकाशाखाली, एकांतात आकाशाकडे तोंड करून बसल्याचे या फोटोमध्ये दिसत आहे. यावेळी तिचे डोळे बंद आहेत.

तिसऱ्या फोटोमध्ये दिस आहे की, आलिया चेहऱ्यावर आणि डोळ्यांवर हात ठेवून हसत आहे. या फोटोंमध्ये आलिया खूपच क्यूट दिसत आहे.