भारतात अनेक नद्यांचा संगम आहे अनेक नद्या भारतातून वाहतात यातीलच एक नदी म्हणजे सरस्वती नदी या नदीचा उल्लेख वेदांमध्येही आढळतो. वेदांनुसार, सरस्वती नदी आजही वाहते पण ती दिसत नाही विज्ञानानुसार, सरस्वती नदी अनेक वर्षांपूर्वी ही नदी वाहत होती पण आता ती लुप्त झाली आहे. शास्त्रानुसार, एका शापामुळे सरस्वती नदी लुप्त झाली आहे. तर काही पौराणिक कथांनुसार, वरदान मिळाल्याने सरस्वती नदी लुप्त झाली आहे. असं म्हटलं जातं की, वरदानामुळे प्रयागराजमध्ये गंगा,यमुना आणि सरस्वती नदीचा संगम होतो. पण जरी सरस्वती नदी दिसत नसली तरीही आजही ती अस्तित्वात असल्याचं म्हटलं जातं.