भारताची ताकद आणखी वाढली असून यामुळे शत्रू राष्ट्र चीन आणि पाकिस्तान ला धडकी भरणार आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात 90 हजार कोटींचा संरक्षण करार झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसीय फ्रान्स दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी त्यांनी फ्रान्ससोबतच्या महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीय लष्कराची ताकद आणखी वाढणार आहे. फ्रान्सकडून 26 राफेल-एम विमाने आणि तीन स्कॉर्पिन पाणबुडी विकत घेण्याच्या करारावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांचा फ्रान्स दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. फ्रान्स आणि भारताच्या धोरणात्मक संबंधांना 25 वर्ष पूर्ण झाली आहे. पंतप्रधान मोदी सहाव्यांदा फ्रान्स दौऱ्यावर आहेत.