शिवजयंती निमित्त चित्रकार सुमन दाभोलकर यांनी स्टोन आर्ट साकारलं आहे. दगडाला कोणत्याही प्रकारचा आकार न देता त्यावर पेंटिंग करत सुमन दाभोलकर यांनी स्टोन आर्ट साकारलं आहे. स्टोन आर्ट अर्थात दगडावर नक्षीकाम करुन एखादी कलाकृती करणं म्हणजे जणू निर्जीव दगडात जीव ओतण्यासारखं आहे. आतापर्यंत सुमन यांनी 50 हून अधिक शिल्पकृती साकारल्या आहेत. महाराजांच्या जयंती निमित्तानं विविध ठिकाणी बहुविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येतं. दरवर्षी 19 फेब्रुवारी या दिवसी हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते. सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटकांचे सादरीकरण अथवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महाराजांच्या पुतळ्यास अथवा स्मारकास पुष्पहार अर्पण केला जातो.