रणबीर कपूरची आणि आलिया भट्ट यांची प्रेमकहाणी संजय लीला भन्साळी यांच्यासमोर सुरू झाली होती. आलिया पहिल्यांदा रणबीर कपूरला संजय लीला भन्साळी यांच्या सेटवरच भेटली होती. त्यावेळी ती फक्त 11 वर्षांची होती. आलियाच्या मुलाखतीची एक क्लिप सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मुलाखतीत आलिया भट्टने सांगितले आहे की, ती ब्लॅकच्या सेटवर रणबीर कपूरला पहिल्यांदा भेटली त्यावेळी ती फक्त 11 वर्षांची होती. रणबीर कपूरसमोर आलिया भट्ट खूप लाजली होती. तिने स्वत: याबाबत सांगितले आहे. आलिया तिच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असते. आलियाचा आगामी चित्रपट गंगूबाई काठियावाडी प्रदर्शित होत आहे. आलियाचे रणबीर कपूरसोबतचे नाते सध्या चर्चेचा भाग बनले आहे. आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते.