पचनाच्या वेळी पोटातील गॅस, द्रव आणि घन पदार्थांची हालचाल यामुळे गुडगुड असा आवाज येतो. त्यामुळे पोटात गुडगुड होणं अगदी सामान्य मानलं जातं.
ही समस्या काही काळासाठी असल्यास ही सामान्य बाब आहे, पण ही समस्या दीर्घकाळ असल्यास याकडे दुर्लक्ष करु नका.
याकडे दु्र्लक्ष करणं तुमच्यासाठी नुकसानदायक ठरु शकतं. पोटात गुडगुड होण्याची समस्या दिर्घकाळ राहिल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पोटात गुडगुड होण्याचा आवाज काही आजारांचे संकेत असण्याची शक्यता आहे.
पोट रिकामे असल्यास आणि भूक लागली असल्यास पोटातून गुडगुडण्याचा आवाज येऊ शकतो. तुम्ही अन्न खाल्ल्यावर हा आवाज कमी होतो. त्यामुळे पोटात गुडगुड झाल्यावर खाल्लं पाहिजे.
घाईघाईत जेवणं, खूप जलद खाणं, आम्लयुक्त पदार्थ खाणं, गॅस्ट्रोएसोफेजल रिफ्लक्स रोग किंवा इरिटेबल बोवेल सिंड्रोम यामुळे देखील पोटात गुडगुड होऊन अस्वस्थ वाटू शकतं.
बर्याच वेळा जेव्हा आपण लैक्टोज किंवा ग्लूटेनन युक्त अन्न खातो तेव्हा त्यांच्या पचनामध्ये समस्या निर्माण होतात. त्यामुळे पोटात गुडगुडण्याचा आवाज येऊ शकतो.
अन्न पचनादरम्यान आतड्यांमध्ये अडथळे निर्माण झाल्यामुळे पोटात गुडगुडण्याचा आवाज येतो.
त्यामुळे पोटदुखी, पोट फुगणे, बद्धकोष्ठता किंवा उलट्या यांसारखी लक्षणेही दिसू लागतात. असे झाल्यास, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
अन्नपचनावेळी पोटातील हालचाली आणि क्रियांमुळे गुडगुड आवाज होणं सर्वसामान्य आहे.
अन्नपचनावेळी पोटातील हालचाली आणि क्रियांमुळे गुडगुड आवाज होणं सर्वसामान्य आहे.
मात्र, ही समस्या दिर्घकाळ जाणवत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
मात्र, ही समस्या दिर्घकाळ जाणवत असल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
याकडे दुर्लक्ष केल्यास समस्या वाढेल आणि हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरेल.
याकडे दुर्लक्ष केल्यास समस्या वाढेल आणि हे तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरेल.