Summer Tips : सावधान! उन्हाळ्याच्या दिवसात 'हे' पेय पिण्याची चूक करु नका, आरोग्यावर होईल वाईट परिणाम



उन्हाळ्यामध्ये आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात उष्माघातासाह इतर आजार होण्याची शक्यता असते.



उन्हाळ्यात आपण अनेकदा डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी काय ठेवण्यासाठी अधिक पेय पिण्याचा सल्ला दिला जातो.



पण, आपण उन्हाळ्यात काही पेय प्यायल्यानं तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.



जर तुम्ही उन्हाळ्यात खूप जास्त कॉफी प्यायली तर ती तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतं. कॉफीमध्यं असलेल्या कॅफीनमुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, ज्यामुळे तुम्ही डिहायड्रेट होऊन आजारी पडू शकता.



उन्हाळ्यात शक्यतो कॉफीचे सेवन टाळण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला कॉफी प्यायल्याशिवाय जमत नसेल तर एक किंवा दोन कपपेक्षा जास्त कॉफी पिऊ नका. अतिरेक टाळा



उन्हाळ्यात चहा पिणंही टाळावा. चहामध्येही कॅफिन असते, यामुळे तुमचं शरीर डिहायड्रेट होऊ शकतं. याशिवाय चहा प्यायल्याने तुम्हाला लघवी जास्त होते.



उन्हाळ्यात जास्त चहा प्यायल्याने तुमच्या शरीराचं निर्जलीकरण होऊ शकतं. चहा युरेटिक प्रमाणे काम करतो. यामुळे तुम्हाला वारंवार लघवी होण्याची समस्या होते.



उन्हाळ्यात सोडा प्यायल्यामुळे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचते. सोड्यामध्ये कार्बन आणि भरपूर प्रमाणात फॉस्फोरिक ऍसिड असते.



यामुळे हृदय आणि मूत्रपिंडाचे आजार होऊ शकतात. जर तुम्ही रोज सोडा प्यायला तर तुम्हाला ऑस्टियोपोरोसिस सारखी समस्या होऊ शकते.